29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रसर्वांगिण विकासाअभावी १० वर्षांत मतदारांत रोष

सर्वांगिण विकासाअभावी १० वर्षांत मतदारांत रोष

साक्री : लोकसभा निवडणूक प्रचार रंगतदार अवस्थेत आलेला असताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडू लागलेल्या आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील साक्री विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रीय मुद्यांसोबतच स्थानिक मुद्दे देखील प्रकर्षाने निवडणुकीच्या केंद्रस्थानी दिसून येत आहेत. विशेषत: परिवर्तन होवून देखील गेल्या दहा वर्षात तालुक्याच्या सर्वांगीण विकासात फारशी प्रगती दिसून येत नसल्याने मतदारांचा रोष या निमित्ताने व्यक्त होताना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात येत्या १३ मे रोजी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया होत आहे.

यात साक्री विधानसभा मतदारसंघात देखील मतदान होणार असल्याने प्रचाराला अवघा पंधरा दिवसांचा कालावधी उरला आहे. या कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप, काँग्रेससह अन्य इच्छुक उमेदवारांचा सुरू आहे. यातून प्रचारात रंगत आली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये राष्ट्रीय प्रश्नांसोबतच स्थानिक प्रश्नांचा देखील ऊहापोह होताना दिसत आहे. खासदारांची भूमिका यावरही चर्चा होत असली तरी स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खासदारांची भूमिका यावर देखील मोठी चर्चा होताना दिसत आहे.

निवडणूक प्रचाराच्या या धामधुमीत साक्री तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात चर्चा यंदा होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून साक्री तालुक्यात बंद असलेल्या पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या प्रगतीवर यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहेत. नवीन कुठलाही औद्योगिक प्रकल्प सुरू झालेला नसताना आधीचेही प्रकल्प सुरू करण्यात प्रगती झालेली नसल्याने बेरोजगारीचा मुद्दा या निमित्ताने ऐरणीवर येत आहे. याशिवाय सिंचनाचे कुठलेही नवीन प्रकल्प तालुक्यात होऊ शकलेले नाहीत

. याउलट तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाला देखील चालना मिळू शकलेली नाही. त्यांच्या वितरिकांच्या कामांमध्ये देखील कुठलीही प्रगती झाल्याचे दिसत नाही. याचा परिणाम तालुक्याच्या सिंचनावर झालेला दिसून येतो. तालुक्यात उच्च शिक्षणाच्या सुविधांचा अभाव दिसून येतो. अजूनही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरांची वाट धरावी लागतेय. कधीकाळी साक्री तालुक्यासाठी रेल्वेचे आश्वासन निवडणूक प्रचारात देण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR