28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रअनिल अंबानींनी केले मतदान

अनिल अंबानींनी केले मतदान

मुंबई : देशात सर्वसामान्य व्यक्तीपासून बड्या व्यक्तीपर्यंत सर्वांना मतदानाचा समान अधिकारी आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानीसुद्धा सकाळीच बाहेर पडले. सकाळी ६.४५ च्या सुमारास मतदान सुरु होण्यापूर्वी ते रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान सुरु झाले. मतदानासाठी सकाळापासून सर्वसामान्य मतदारांनी रांगा लागल्या. त्याच्याप्रमाणे बॉलीवूडमधील कलाकार, उद्योजक मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील सर्वत्र मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. मतदानास सकाळी सात वाजता सुरुवात होण्यापूर्वी मतदार रांगेत होते. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीसुद्धा मतदान सुरु होण्यापूर्वी रांगेत लागलेलेचा व्हिडिओ समोर आला आहे.

अक्षय कुमारने केले मतदान
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मतदानासाठी रांगेत लागला. अक्षय कुमारने जुहू येथे मतदान केले. मतदान करुन आल्यानंतर अक्षय कुमार याने सर्व जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अक्षय कुमारने यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक मतदानाचा विक्रम होणार असल्याचे सांगितले. दुस-यांदा भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार पहिल्यांदा मतदानासाठी गेला होता.

उमेदवारांनी केले मतदान
उमेदवार आणि लोकप्रतिनिधी यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. यामिनी जावध यांनी सकाळीच मतदान केले. उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मतदान केले. राहुल शेवाळे यांनीही मतदान केले. उल्हासनगरमधील भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

काही ठिकाणी ईव्हीएम पडले बंद
डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडली. ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना इतर ठिकाणी घडल्या. निवडणूक कर्मचा-यांनी ईव्हीएम मशीन बदलून मतदान सुरु केले. त्यामुळे काही ठिकाणी मतदानास उशीर झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR