22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनअनिल कपूरने केला जवानांना सलाम

अनिल कपूरने केला जवानांना सलाम

मुंबई : आज भारतीय वायुसेना दिनानिमित्त अभिनेता अनिल कपूरने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या खास दिवशी त्याने हवाई दलाच्या जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. अनिल कपूरने जानेवारीमध्ये आलेल्या ‘फायटर’ या चित्रपटात ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग ऊर्फ ​​रॉकीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनिल कपूरने एअर बेस कॅम्पमध्ये बराच वेळ घालवला होता. हा अनुभव त्यांनी आज वायुसेना दिनानिमित्ताने शेअर केला आहे. भारतीय वायुसेना दिनानिमित्त अभिनेता अनिल कपूर म्हणाला, हवाई दलाच्या सर्व ख-या नायकांना माझा मनापासून सलाम.

आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. भारतीय हवाई दलातील या शूर जवानांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची मला संधी मिळाली. तुमचे समर्पण आम्हाला प्रेरणा देते. भविष्यात अधिकाधिक भारतीय तरुण या सैन्यात सामील होतील आणि वायुसेना आणखी मजबूत करतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली.

यावर्षी जानेवारी महिन्यात ‘फायटर’ चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली होती. यामुळे फायटर २०२४ या वर्षातील पहिला सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता. हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका व्यतिरिक्त, ‘फायटर’मध्ये करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अझीझ आणि इतर सहाय्यक भूमिकांसह उत्कृष्ट स्टारकास्ट होते. अलीकडेच अनिल कपूरने ‘बिग बॉस’ ओटीटी ३ मधून होस्ट म्हणून डेब्यू केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR