24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकेरळ स्फोटात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

केरळ स्फोटात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

तिरुअनंतपुरम : केरळमधील एर्नाकुलम येथे २९ ऑक्टोबर रोजी ख्रिश्चन प्रार्थना सभेत झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या आता ५ झाली आहे. या अपघातानंतर १५ दिवसांनी आणखी एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या स्फोटात ५२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाच्या दिवशी दोन जणांचा मृत्यू झाला होता. हळूहळू हा आकडा ४ वर पोहोचला होता.

दुसरीकडे पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. एडीजीपी कायदा आणि सुव्यवस्था यांच्या नेतृत्वाखालील २० सदस्यीय पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी तपास सुरू असून आम्‍ही अनेक बनावट सोशल मीडिया खाती ओळखली आहेत. जी भडकाऊ पोस्ट करत आहेत, असे केरळ पोलिसांचे म्हणणे आहे.

या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५४ गुन्हे दाखल केले आहेत. मलप्पुरम जिल्ह्यात सर्वाधिक २६ गुन्हे दाखल झाले आहेत. एर्नाकुलम दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे १५ प्रकरणे नोंदवली गेली. यानंतर तिरुअनंतपुरमचा क्रमांक येतो, जिथे पाच गुन्हे दाखल करण्यात आली.

समरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये २९ ऑक्टोबरला हा स्फोट झाला होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास या केंद्रात यहोवाच्या साक्षीदारांची (ख्रिस्ती धर्मातील एक पंथ) परिषद सुरू होती. कार्यक्रमादरम्यान सभागृहात दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. प्रार्थना सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांतच सभागृहात स्फोट झाला. पहिल्या स्फोटानंतर काही वेळातच दुसरा स्फोटही झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR