22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeसोलापूरअतिक्रमण प्रतिबंधक विभागाची नवी पेठेत कारवाई

अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची नवी पेठेत कारवाई

सोलापूर – महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने गजबजलेल्या नवी पेठ मध्ये आणि विजापूर महामार्गावरील फुटपाथ वरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली. येथील साहित्य जप्त केले.

सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून नवी पेठ येथे कारवाई करण्यात आली. यावेळी चार चाकी हात गाडी वाल्या विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. या कारवाईत पथकाने चार चाकी एक हात गाडी, एक लोखंडी काउंटर आणि इतर साहित्य जप्त केले. दरम्यान, विजापूर रोड फुटपाथॉवर रहदारीस अडथळा येईल अशा प्रकारे अतिक्रमण करून भाजी व फळ विक्रेते व्यवसाय करत आहेत.

यामुळे या ठिकाणी सायंकाळी नियमितपणे कारवाईची मोहीम राबवली जात आहे. यावेळी येथील भाजी, कॅरेट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. सोलापूर शहरात अनधिकृतपणे रहदारीस अडथळा ठरेल अशा प्रकारे कोणीही व्यवसाय करू नये. अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रभारी प्रमुख मुर्तुजा शहापुरे यांनी केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR