30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रलाडकी बहिण योजनेची अर्ज प्रक्रिया मोफत

लाडकी बहिण योजनेची अर्ज प्रक्रिया मोफत

मुंंबई : लाडकी बहिण योजनेबाबत सर्व भगिनींना विनंती करतो की, एजंटच्या नादी लागू नका. कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचा-याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून काढून टाकले, सस्पेंड केलं. त्याला बडतर्फ करण्याचा विचारही राज्य सरकार करत आहे. सेतू कार्यालय किंवा अंगणवाडी सेविकांना प्रतिफॉर्म ५० रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. यावर जर सेतू केंद्राने पैसे घेतले तर त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल. लाडकी बहिण योजना पारदर्शकपणे राबण्याचा आमचा हेतू आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधानसभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने अनेक चांगल्या योजनांची घोषणा केली आहे. माझी लाडकी बहिण ही अत्यंत महत्वकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे. या योजनेमध्ये काल काही बदल करण्यात आले आहेत. २१ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये आहे. त्यांना १५०० रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असेही फडणवीस यांनी सांगितले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाच एकर जमिनीबाबतची अट होती, ती आम्ही काढून टाकली आहे. शिवाय १५ दिवस नाही, तर अर्ज भरण्यासाठी ६० दिवसांची मुदत आपण दिली आहे. ६० दिवसांमध्ये जे अर्ज करतील, त्यांनी १ जुलैला अर्ज केला असे समजून दोन्ही महिन्यांचे पेमेंट मिळेल. ऑगस्टनंतर जे अर्ज करतील त्यांना त्या दिनांकापासूनचे पेमेंट मिळेल, असा निर्णय घेण्यात आला. डोमेसाईलचा दाखल्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, त्याला आम्ही नव-याचा जन्म दाखला किंवा रेशनकार्ड असे पर्याय दिले आहेत. शिवाय मतदार यादीतील नाव असेल तरी तो डोमेसाईलला पर्याय असणार आहे. त्यामुळे आता रांगांमध्ये उभे राहण्याची गरज नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR