26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्र‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्रा धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता; परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडविली आहे त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारावे जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही तटकरे यांनी या वेळी सांगितले.

अन्नपुर्णा योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करा
गरीब कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देणा-या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR