सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व स्मशानभूमीचे कामकाजाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली करण्यात येणार असून मनपा मालकीच्या स्मशानभूमीमध्ये होणाऱ्या अंत्यविधी कामी नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या आदेशाने त्या ठिकाणी १० आरोग्य निरीक्षक व १३ कर्मचारी यांच्या माध्यमातून अंत्यविधीकामी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. आरोग्य निरीक्षक यांनी समशान भूमी येथील स्वच्छता, देखभाल तसेच समशानभूमी येथे होणाऱ्या अंत्यविधीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय मनपा मालकीच्या स्मशानभूमीच्या येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी.
मृत्यू नोंदणी रजिस्टर व पिवळे पावती सर्व समशानभूमी येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच सर्व समशानभूमी येथे आवश्यकता असणाऱ्या विद्युत पुरवठा,पथदिवे, पाणीपुरवठा इतर सोयीसुविधा हे सर्व विभागीय कार्यलय यांच्याकडून करण्यात येईल. शहरातील सर्व समशानभूमी येथे नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली.