23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयशेतक-यांच्या उत्पन्नवाढीसाठी १४ हजार कोटींच्या ७ योजनांना मंजुरी

शेतक-यांच्या उत्पन्नवाढीसाठी १४ हजार कोटींच्या ७ योजनांना मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने शेतक-यांसाठी ७ मोठे निर्णय घेतले असून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्वनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाने सोमवारी शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ७ योजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमाहे १४,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्न आणि पोषण या पीक विज्ञानासाठी ३ हजार ९७९ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. शाश्वत पशुधन आरोग्यासाठी १,७०२ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने २ हजार ८१७ कोटी रुपयांच्या डिजिटल कृषी मिशनलाही मंजुरी दिली आहे. या सर्व निर्णयांमुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढेल. तसेच, फलोत्पादन विकासासाठी ८६० कोटी आणि कृषी विज्ञान केंद्रांसाठी १ हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR