मुंबई : प्रतिनिधी
महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ८७ हजार ३४२ कोटी ८६ लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखो-यातून वैनगंगेतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणता येईल. यासाठी एकूण ४२६.५२ कि. मी. चे जोड कालवे बांधण्यात येतील.
विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील १५ तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. रबी हंगामात पाण्याचा वापर करता यावा, म्हणून ३१ साठवण तलावदेखील बांधण्यात येणार आहेत. राष्ट्रीय जल विकास अभिकरणामार्फत याचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०१८ मध्ये सादर करण्यात आला होता. केंद्रीय जल आयोगानेदेखील यास मान्यता दिली असून राज्य जल परिषदेच्या बैठकीत हा प्रकल्प एकात्मिक राज्य जल आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे.
९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान
९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान राबवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत.