39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeधाराशिवधाराशिवमध्ये ओमराजेंच्या विरोधात अर्चना पाटील

धाराशिवमध्ये ओमराजेंच्या विरोधात अर्चना पाटील

मुंबई : महायुतीचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला असून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आता अर्चना पाटील लढणार आहेत. त्या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत.

नुकताच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर धाराशिवमधून त्यांची उमेदवारी देखील घोषित झाली आहे. धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने आता राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील मैदानात उतरल्या आहेत. ही जागा राणा जगजितसिंह पाटील यांनी लढवावी, असा प्रस्ताव यापूर्वीच अजित पवार यांनी दिला होता.

मात्र, सध्या भाजपात असणा-या राणा पाटील यांनी यासाठी साफ नकार दिला आहे. राणा जगजितसिंग पाटील यांनी आज सकाळीच अजित पवारांची भेट घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR