सोलापूर-
रायझिंग स्पोर्ट्स क्लब अजनाळे (ता. सांगोला) यांनी आयोजित केलेल्या खो खो स्पर्धेत पुरुष गटात अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ वेळापूरने विजेतेपद पटकाविले.
मंगेवाडी (ता. सांगोला) येथील दत्तात्रय चौगुले विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात वेळापूरने मंगळवेढ्यास ११ गुणांनी हरविले. उपांत्य फेरीत वेळापूरने सोलापूरच्या किरण स्पोर्ट्सचा तर मंगळवेढ्याने उत्कर्ष क्रीडा मंडळ सोलापूरचा पराभव केला. जिल्हा खोखो असोसिएशनचे निरीक्षक प्राध्यापक धोंडीराम पाटील, पंच प्रमुख प्रल्हाद जाधव, सह पंच प्रमुख अजित बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष गटाच्या स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, सोलापूर खो- खो असोसिएशनचे सचिव अजितकुमार संगवे खजिनदार श्रीरंग बनसोडे, माणदेश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद यलपले, सचिव महिंद्र यलपले, मुख्याध्यापक शामराव कोळवले, उद्योगपती शशिकांत येलपले, त्रिमूर्ती पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत चौगुले, माजी राष्ट्रीय खेळाडू मयूर लाडे, छाया चौगुले आदींच्या प्रमुख उपस्थित झाले. उपस्थित आमचे स्वागत आशिष कोळवले, राकेश पवार, विशाल लिगाडे,विजय टिंगरे बाबासो धांडोरे यांनी केले. रमेश येलपले व आप्पाराव धांडोरे यांनी केले.
या स्पर्धेतील प्रथम चार संघास १५, ११, ७ व ४ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. पुरुष गटांची बक्षिसे टॉप टेन ग्रुप अजनाळे, माडगूळकर ज्वेलर्स सांगोला, विनोद येलपले फूट सांगोला,अतुल कोळवले यांनी पुरस्कृत केली होती.