मुंबई : मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीसह अन्य दोन जणांना अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने या व्यक्तीला गुजरातमधील वडोदरा शहरातून अटक केली. आरोपी व्यक्ती दारूच्या नशेत नव्हता. त्याने हा ईमेल का पाठवला याची माहिती गुन्हे शाखा गोळा करत आहे.
आरोपीने मंगळवारी पाठवलेल्या मेलमध्ये आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. या ईमेलमध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्या मिळाल्या होत्या.