नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गतविजेता नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट ठरला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरच्या दुस-या थ्रोसह नवीन ऑलिम्पिक विक्रम रचला आणि सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदकासह नदीमला ५० हजार डॉलर्स इतकी रक्कम बक्षीस रूपात मिळाली आहे.
दरम्यान, गतविजेता नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरच्या दुस-या थ्रोसह नवीन ऑलिम्पिक विक्रम रचला आणि सुवर्णपदक जिंकले.
१८९६ मध्ये ऑलिम्पिक सुरू झाल्यापासूनच या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना केवळ पदके देण्यात येत होती. टोकियो ऑलिम्पिकपर्यंत कोणत्याही विजेत्याला बक्षीस रक्कम दिली जात नव्हती, मात्र यावेळी जागतिक अॅथलेटिक्सने बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नदीमला ५० हजार डॉलर्स मिळाले. पाकिस्तानी रुपयांत ते अंदाजे १ कोटी ४० लाख रुपये झाले. कोणत्याही अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी ही बक्षीस रक्कम मिळते. जर एकापेक्षा जास्त खेळाडू असतील तर बक्षिसाची रक्कम त्यांच्यामध्ये समान प्रमाणात विभागली जाते.
नीरज चोप्राला ऑलिम्पिक किंवा जागतिक अॅथलेटिक्समधून रौप्य पदक जिंकल्याबद्दल कोणतीही बक्षीस रक्कम मिळालेली नाही. या ऑलिम्पिकमध्ये जागतिक अॅथलेटिक्सने केवळ सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनाच बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणा-या ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्समधील रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांनाही बक्षीस रक्कम दिली जाईल. अॅथलेटिक्सशिवाय यावेळी इतर कोणत्याही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस रक्कम मिळालेली नाही.
३२ वर्षांनंतर पाकिस्तानला पदक
१९९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिकनंतर पाकिस्तानचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे. पाकिस्तानने यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली होती. वैयक्तिक स्पर्धेत पाकिस्तानने सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. नदीमने नॉर्वेच्या अँड्रियास टीचा ऑलिम्पिक विक्रम मोडला.