29.7 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeराष्ट्रीयअरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ?

अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ?

ईडीकडून नवव्यांदा समन्स

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने हे नववे समन्स पाठवले आहे. नवीन समन्सनुसार अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री केजरीवाल यांना नवव्यांदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास यंत्रणेने त्यांना २१ मार्च २०२४ रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आता या वेळीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर होतात की नाही हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने केजरीवाल यांना यापूर्वी ८ वेळा समन्स पाठवले आहेत, परंतु ते चौकशीसाठी एकदाही हजर झाले नाहीत. ईडीने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR