18.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरअरविंद खोपे मृत्यू प्रकरण; पोलिसांचा तपास राजकीय दबावात?

अरविंद खोपे मृत्यू प्रकरण; पोलिसांचा तपास राजकीय दबावात?

लातूर : प्रतिनिधी
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे अध्यक्ष असलेल्या ‘जेएसपीएम’ संस्था संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहातील १३ वर्षीय अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संस्थेच्या वस्तीगृहात संशयास्पद मृत्यू प्रकरणात न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढवण्याचे निर्देशेनानंतर या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिका-यांकडे वर्ग झाला. याला २४ तास पुर्ण झाले नाही तोवरच त्यांनी आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल न्यायालयापुढे सादर करीत अरविंदने आत्महत्या केल्याचे नमुद करीत आरोपींची न्यायालयीन कोठडी मागीतली.

त्यानूसार न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर याच दरम्यान अरविंदच्या समाजबांधवानी सुरु केलेल्या तीन दिवशीय धरणे आंदोलनात पोलिस राजकीय दबावात तपास करीत असल्याचा आरोप करुन याप्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी संशयीत आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने या प्रकरणाचा तपास करणा-या उपविभागीय पोलिस अधिका-यांनी या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या वस्तीगृह व्यवस्थापक विठ्ठल सुर्यवंशी व विनायक टेकाळे यास जिल्हासत्र न्यायालयापुढे हजर केले.

न्यायालयापुढे अरविंदने आत्महत्या केल्याचे नमुद करत संशयीत आरोपींना न्यायालयीन कोठडी मागीतल्याने न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर दुसरीकडे याच दरम्यान लातूरातील महात्मा गांधी चौकात अरविंदच्या समाजबांधवानी सुरु केलेल्या तीन दिवशीय धरणे आंदोलनात पोलिस राजकीय दबावात तपास करीत असल्याचा आरोप करीत याप्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्याची मागणी केली असून लातूरकरांत नेमक याप्रकरणात काय चालु आहे व सत्यता काय आहे याचीच चर्चा सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR