31 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeराष्ट्रीयपार्लरमध्ये जाते म्हणून पत्नी पळाली प्रियकरासोबत

पार्लरमध्ये जाते म्हणून पत्नी पळाली प्रियकरासोबत

सारण : बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. इथे नवविवाहित महिलेने लग्न होऊन १ महिना न होताच जे केले त्याने सर्वांनाच धक्का बसला. लग्नाच्या २५ व्या दिवशी ती पतीला सोडून प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, वाटेत पतीने तिला गाठले आणि हे प्रकरण पोलिसांत पोहोचले. शुक्रवारी संबंधित महिला तिच्या पतीसोबत बाजारात निघाली होती. अशातच तिने पार्लरला जाते असे सांगून तिथून पळ काढला. खूप वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. तितक्यात पतीने तिला दुस-याच्या गाडीत बसल्याचे पाहून एकच गोंधळ घातला. मग स्थानिकही त्याच्या मदतीला धावले.

दरम्यान, आपल्या पत्नीला अनोळखी व्यक्तीच्या वाहनात पाहून पती घाबरला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली आणि पोलिसांनाही याची माहिती मिळाली. काही वेळातच पोलिस तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत नवविवाहित महिला, तिचा पती आणि तिच्या प्रियकराला पोलिस ठाण्यात नेले. नवविवाहितेच्या पतीने सांगितले की, त्याचा विवाह ११ मार्च २०२४ रोजी झाला होता. पत्नीने त्याला दमदाटी करून आपल्या माहेरी जाण्याचा आग्रह धरला होता.

आत्महत्येची दिली धमकी
पत्नीच्या आग्रहास्तव पती तिला घेऊन त्याच्या सासरच्या घरी निघाला होता. मात्र, पत्नीने प्रियकरासह पळून जाण्याचा कट रचला होता. नवविवाहित महिलेने पोलिसांना सांगितले की, माझ्या विरोधाला न जुमानता कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी जबरदस्तीने माझे लग्न लावून दिले. मला आजही माझ्या प्रियकरासोबत राहायचे आहे. यानंतरही जबरदस्ती झाली तर मी आत्महत्या करून जीवन संपवेन. पण, मी माझ्या पतीसोबत राहणार नाही. सध्या पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR