35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeसोलापूरभीमा नदी कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

भीमा नदी कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

मंगळवेढा : मंगळवेढ्यातून वाहणारी भीमा नदी चक्क कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, तालुक्याच्या दक्षिण भागात पाण्याचे टँकर सुरू करून नागरिकांची तहान भागविली जात असताना नदीकाठच्या भागात मात्र टैंकर मिळणे मुश्कील बनले आहे.

मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवरून भीमा नदी वाहत असून, या नदीतील पाण्याचा सोर्स उजनी धरण असल्याने धरण भरले तरच नदीत पाणी उपलब्ध होऊ शकते, अन्यथा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत राहण्याची शक्यता असते. मागील दोन महिन्यांपूर्वी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी नदीपात्रातील कोप बंधाऱ्यात काहीअंशी साठून राहिल्याने आजपर्यंत नदीकाठावरील मंगळवेढा शहर, उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, माचणूर,मुंढेवाडी, तामदडर्डी, रहाटेवाडी, तांडोर बोराळे, अरळी सिध्दापूर, नंदूर आर्द गावांचा नळ पाणीपुरवठा सुरू होता मागील १५ ते २० दिवसांपासून नदीपात्रात चिमणीला पिण्याइतपतह पाणी नसल्याने मुक्या प्राण्याचे हाल होत आहेत.

तसेच वाडी-वस्त्यांव शेतीसाठी राहिलेले शेतकरीह पाण्यासाठी दाही दिशा फिरतानाच चित्र आहे. पाण्याअभाव नदीकाठावरील शेती अडचणीत आल असून, उभी पिके करपत आहेत. ऊस पीक उभे करण्यासाठी शेतकऱ्यांन बँकांकडून कर्ज घेतले आहे. भविष्यात या पिकाचे काय होणार, या विवंचनेने शेतकरी चिंतित आहे. जिल्हाधिकार कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा पात्रात पाणी सोडले असल्याचे सांगितल्याने नदीकाठच्य गावांतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. परिणामी या पाण्यामुळे पावसाचे मृग नक्षत्र निघेपर्यंत दिलासा मिळणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR