29.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्र‘वंचित’ ‘गॅस सिलेंडर’वर विधानसभा लढविणार

‘वंचित’ ‘गॅस सिलेंडर’वर विधानसभा लढविणार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आपापल्या स्तरावर तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुका लढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘गॅस सिलेंडर’हे नवे चिन्ह दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मागे नाही. केंद्रीय निवडणूक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात ‘गॅस सिलेंडर’ चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे.

२५ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा केला. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी केल्याचे दिसले. राज्यातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीसाठी ही चांगली बाब मानली जात आहे. दरम्यान, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्वच मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीने ‘गॅस सिलेंडर’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विधासभा निवडणुकांत काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडर अशा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली होती.

प्रहारला मिळाले ‘बॅट’
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले आहे. यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा कपबशी चिन्हावर निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत प्रहारला शिट्टी हे चिन्ह मिळाले होते. यानंतर आता प्रहार पक्षाला पुढच्या निवडणुका ‘बॅट’या चिन्हावर लढवाव्या लागणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR