सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या रेणुका शुगर्स मिल बगॅस यार्डमध्ये वादावादीच्या कारणातून सुरक्षा रक्षकावर पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुरक्षारक्षक अंकुश रामकृष्ण शिंदे (रा. भरतगाववाडी, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सत्यवान बाळकृष्ण साळुंखे (रा. बोरगाव, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार शुभम बाळासाहेब चव्हाण (रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादीनुसार दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडे चारच्या सुमारास हा प्रकार घडला.