सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार आमदार प्रणिती शींदे विरूध्द आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार टक्कर सुरू असून प्रत्येक फेरीच्या निकालानंतर मतांचा धावफलक बदलत आहे.’ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत अकरा फेऱ्यांची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण दोन लाख ७६ हजार ७४७ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना तीन लाख ३७२ मते पडली आहेत. अकराव्या फेरीअखेर प्रणिती शिंदे २३ हजार ६२५ मतांचा लिड आहे.आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपपुढे जोरदार आव्हान उभे केले असून तगडी टक्कर त्या भाजपला देत आहेत.सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात प्रणिती शींदे आणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले आहे.