27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रमेहबूब शेख यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल

मेहबूब शेख यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीच्या कलमाअंतर्गत
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या प्रकरणी फिर्यादी तरुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघांवर क्रॉस एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणावर मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेवाडा येऊन आपल्याला शिवीगाळ करत असेल, त्यावर आपण प्रतिक्रिया देत असू, त्यावर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हा माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मी सुद्धा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मलाही मार लागलेला आहे. मला जो मार लागला आहे त्याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. त्यावेळी तो दारुच्या फूल नशेत होता. त्यावेळी त्याची मेडिकल तपासणी का केली नाही? असा सवाल मेहबूब शेख यांनी केला.

महेबूब शेख गुरुवारी (२७ डिसेंबर) रात्री आमदार निवास येथे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या रुमवर मुक्कामी होते. यादरम्यान एक तरुण मद्यधुंद अवस्थेत क्षीरसागर यांच्या रुमवर येऊन मुक्कामाचा हट्ट करु लागला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. आता याप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR