22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला

रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला

अलिबाग : शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले. मात्र या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाल आहे. या हल्ल्या प्रकरणी आमदार पुत्र विकास गोगावले सह २० ते २५ जणांविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची २ मे रोजी महाड येथील सभा आटोपून नवगणे परत इंदापूर इथं आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या चिथावणी वरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हजर होते असा आरोप नवगणे यांनी केलाय. महाड येथील सभेत नवगणे यांनी आमदार भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR