22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपॅरिस ऑलिम्पिक समारंभाच्या उद्घाटनापूर्वी फ्रान्सच्या रेल्वे मार्गावर हल्ले आणि जाळपोळ

पॅरिस ऑलिम्पिक समारंभाच्या उद्घाटनापूर्वी फ्रान्सच्या रेल्वे मार्गावर हल्ले आणि जाळपोळ

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक समारंभाच्या उद्घाटनापूर्वी हायस्पीड रेल्वे रुळांवर काही हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. सरकारी मालकीच्या रेल्वे ऑपरेटर एसएनसीएफने सांगितले की, पॅरिसला देशाच्या उत्तर, पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या मार्गावरील स्थानकांना गुरुवारी रात्री आग लागली. मोठ्या प्रमाणावर रेल्वे नेटवर्क विस्कळीत करण्यासाठी हल्ले करण्यात आले असून जाळपोळही करण्यात आली

एनसीएफने दिलेल्या माहितीनुसार, या गोंधळानंतर अनेक रेल्ल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, लंडन आणि पॅरिस दरम्यानच्या सेवांचा मार्ग बदलण्यात आला आहे. प्रवासाचा वेळही ९० मिनिटांनी वाढला आहे. याशिवाय पॅरिसहून येणा-या आणि जाणा-या सर्व हायस्पीड गाड्या आज क्लासिक लाईनवरून पाठवल्या जात आहेत, त्यामुळे लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे. दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने आठवड्याच्या शेवटी अडचणी वाढतील अशी शंका व्यक्त केली जात आहे.

प्रकरणाची चौकशी सुरू
दरम्यान, खेळांना लक्ष्य करणे म्हणजे फ्रान्सला लक्ष्य करण्यासारखे आहे. असे एसएनसीएफने म्हटले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक देशांचे खेळाडू पॅरिसला पोहोचले आहेत. येथे २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR