22.1 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeपरभणीपरभणीत ऑटो चालकाचा चाकुने भोसकून खून

परभणीत ऑटो चालकाचा चाकुने भोसकून खून

परभणी : शहरातील अपना कॉर्नर भागात शनिवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास एका ऑटो चालकाला चार ते पाच जणांनी चाकुने भोसकले. यात गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालकाला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान ऑटो चालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या खून प्रकरणी संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी अपना कॉर्नर भागात ऑटोचा कट लागल्यावरून वाद झाला. या वादात ऑटो चालक संतोष तुकाराम पाईकराव(२१) यांच्यावर चाकुने हल्ला करण्यात आला. यात छातीवर वार लागल्याने ऑटो चालक गंभीर जखमी झाला. ऑटो चालकास शासकीय रूग्णालयात आणि तेथून खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. परंतू उपचारादरम्यान ऑटो चालकाचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी धाव घेऊन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोस्टमार्टेम होऊ देणार नाही अशी मागणी लावून धरल्याने २-३ आरोपींना अटक करण्यात आली त्यानंतर पोस्टमार्टेम करू देण्यात आले.

तसेच नानलपेठ पोलिस स्टेशन या ठिकाणी पोलिस अधीक्षक यांना कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत घटनेबद्दल संताप व्यक्त केला. याप्रसंगी भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख सतीश भिसे, वंचितचे शहराध्यक्ष प्रमोद कुटे, गौतम भालेराव, तुषार कांबळे, सचिन खरात, राहुल डुमने, संजय वाव्हळे, राजू खरात व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR