नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. हैदराबाद येथे दोन्ही संघ आमने-सामने आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीवेळी भारतीय संघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान याला संघातून रिलिज करण्यात आले आहे. बीसीसीआयकडून याबाबात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय विराट कोहलीची रिप्लेसमेंट म्हणून निवडण्यात आलेला रजत पाटीदार भारतीय संघासोबत जोडला गेला आहे.
हैदराबाद कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज आवेश खान याला रिलिज केले आहे. दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड झाली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने शानदार कामगिरी केली होती, त्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान पटकावले.
पण आता पहिल्या कसोटीआधी त्याला रिलिज करण्यात आले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, रणजी सामन्यासाठी त्याला रिलिज करण्यात आले आहे. आवेश खान मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मध्य प्रदेशच्या पुढील रणजी सामन्यासाठी तो उपलब्ध असेल.