सोलापुर — साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने देण्यात येणार्या गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण राष्टृपती पुरस्कारप्राप्त शिक्षक बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते झाल्याची माहीती संचालक सुनिल चव्हाण यांनी दिली.
जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात हा कार्यक्रम नुकताच पार पडला.यावेळी व्यासपीठावर माजी प्रशासनाधिकारी काशिनाथ बिराजदार,गुरुनाथ वांगीकर, चेअरमन भिमराया कापसे,सिद्धाराम माशाळे,दिलीप चौगुले, आप्पाराव इटेकर,सोमेश्वर याबाजी,अनिल गायकवाड,अ.गफुर अरब,नितीन कुलकर्णी,बंदेनवाज शेख,भारत गुणापुरे,आदी उपस्थित होते. चांगले काम करणार्या शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे गरजेचे आहे.
पुरस्कारामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळते असे मत बाळासाहेब वाघ यांनी व्यक्त केले.यावेळी मुख्याध्यापक संतोषकुमार माशाळे, बसवेश्वर जुंदळे, अंबादास चव्हाण, राहुल बनसोडे यांना साने गुरुजी पुरस्काराने तर हाजी रचभरे उर्दु मॉडेल स्कुल या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नर्मदा मिठ्ठा यांनी तर मुरलीधर कडलासकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाऊसाहेब मोरे,विरभद्र यादवाड, विनोद आगलावे,जयंत गायकवाड,उल्हास बिराजदार,धनाजी मोरे,शिवानंद हिरेमठ, महादेवी पाटील, फरजाना रचभरे यांनी प्रयत्न केले.