सोलापूर : जास्त गुंतवणूकदारांकडे जाऊ नका, कॅप टेबल वाढवू नका, तुमच्या कॅप टेबलवर किमान लोक आणि मते ठेवा. व्यवसाय चालवण्यासाठी योग्य सल्लागार घेतले पाहिजे. लोकांना खासगी इक्विटीची अनावश्यक भीती वाटते, प्रायव्हेट इक्विटी तुमच्या व्यवसायात मोठी भर घालते असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटर, साविष्कार आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यातर्फे आयोजित सोलापूर शार्क टँक या राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी यतीन शहा यांनी व्यक्त केले.
या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेतील नवकल्पना व उद्योजक विजेत्याना प्रोत्साहन देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. या वेळी दोन उद्योगात गुंतवणूक ही करण्यात आली. दीप प्रज्वलन आणि अहिल्या देवींच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे परिचय अधिसभा सदस्य आणि सेवावर्धिनीचे चन्नवीर बंकुर यांनी केले. या नंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांनी केले. उद्योजक अमित जैन यांनी स्पर्धा ह्या कशा पद्धतीने पार पडल्या याविषयी माहिती सांगितले. साविष्कार चे देवदत्त जोशी यांनी विद्यापीठाचे नाव कसे उंचावले आहे यासंबंधी बोलत असताना विद्यापीठाने हा उपक्रम घेतल्याने नव उद्योजकजकाना प्रोत्साहन मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांना उद्योजकतेमध्ये एकत्र आणण्याची गरज आहे. देशाची प्रगती आजचा युवक करू शकतो असेही त्यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तन घडून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावे आणि उद्योग क्षेत्रामध्ये नवीन परिवर्तन करावे असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लि कंपनीचे चेअरमन यतिन शहा यांनी उद्योजक व्यवसायात होणाऱ्या बदलाविषयी आणि गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करत असताना कमी व योग्य गुणवणूकदार असणे व्यवसासाठी फायदेशीर ठरतात असे म्हणत त्यांनी त्यांच्या व्यवसाय वृध्दी बाबत ही मांडणी केली ज्यातून युवा उद्योजकांना प्रेरणा मिळाली. प्रा. डॉ. महानवर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सोलापूर मधील उद्योजकता आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रगती करावे. भारतीय बुद्धिमत्ता चांगली असून ग्रामीण भागातील अनेक उद्योजक तयार व्हावेत आणि युवकांची शक्ती हीच देशाची शक्ती आहे. मदतीच्या हातानेच सोलापूर समृद्ध होईल हा विस्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार दीक्षा यादव यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन कमलाकर रुगे यांनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, सविष्कार इंडियाचे देवदत्त जोशी, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अमित जैन, इनक्युबेशन सेंटरचे प्रभारी संचालक डॉ. विकास पाटील, उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुरानी, स्वावलंबी भारत अभियान चे विनायक बंकापुर सविष्कार इंडियाच्या दीक्षा यादव, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि विविध विभागांचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात गुंतवणुकदारानी सृष्टी शर्मा (शक्ती व्हेरियेबल्स) यांच्या व्यवसायात ७५ लाख तर महेश लोंढे (अग्रोव्ही ओरागानीक्स प्रा.लि.) यांच्या व्यवसायात २५ लाख रुपये गुंतवणूक केली. उत्कृष्ट नवेउद्योजक म्हणून प्रथम बक्षीस विभागून शांतनू पाटील ( मिलूप फूड प्रा. लि.) आणि सर्जेराव डोळ्ताडे (लिकशुअर सिसटीम प्रा. लि) यांना १०००० रुपये आणि दुसरे बक्षीस कल्पक शहाणे (गोविन एटरप्राझेस) यांना मिळाले.