21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअयोध्येचे आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार

अयोध्येचे आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार

पुणे : इंडिया आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ) यांनी पुण्यात जुन्नरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी साखर कारखाने आणि शेतक-यांना मिळालेला नफा, या मुद्द्यांवरही भाष्य केलं. तसेच, पंतप्रधान मोदींनी नाशिक दौ-यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाहीतर अयोध्येत २२ जानेवारीला होणा-या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण २२ जानेवारीला नाहीतर, नंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

पुण्यातील जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. तत्पूर्वी विघ्नहर साखर कारखान्यात आसवनी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचं लोकार्पणही शरद पवारांच्या हस्ते झालं.
पंतप्रधान मोदी काल नाशिक दौ-यवर आले होते.

त्यावेळी त्यांनी बोलताना राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली होती. यावरही शरद पवारांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी.

डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापा-यांचा मुलगा व्यापारी आणि शेतक-यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं.ह्व, असं शरद पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR