मुंबई : अभिनेता सलमान खान याचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा याच्या गाडीचा नुकताच मुंबईत अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी आयुष शर्मा त्याच्या कारमध्ये उपस्थित नव्हता आणि त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता.
तेव्हा नशेत असलेल्या एका कारचालकाने आयुष याच्या कारला धडक दिली. ही घटना खार येथे घडली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर देखील सुखरूप आहे.
आयुष शर्मा, सलमान खानची बहीण अर्पिताचा पती आहे. आयुष शर्मा याने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्हयात्री’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आयुष शर्मा अद्याप लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करू शकला नसला तरी, त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.