22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबाबा सिद्दिकी हत्याकांड; १० वा आरोपी अटकेत

बाबा सिद्दिकी हत्याकांड; १० वा आरोपी अटकेत

हल्लेखोरांना पुरवली होती शस्त्रे

मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार, या खून प्रकरणातील ही १० वी अटक आहे. भागवत सिंह असे आरोपीचे नाव आहे. भागवतला नवी मुंबईतील बेलापूर येथून अटक करण्यात आली आहे. तो राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी आहे. हल्ल्याच्या दिवसापर्यंत भागवत सिंह मुंबईतील बीकेसी भागात राहत होता.

तपासादरम्यान भागवत सिंहनेच गोळीबार करणा-यांना शस्त्रे पुरवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी दस-याच्या दिवशी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव होते. त्यांच्या निधनावर देशभरातील बड्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR