24.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयअल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणा-या आरोपींना जामीन

अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणा-या आरोपींना जामीन

मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबतचे कनेक्शन समोर

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा सध्या मोठ्या वादात सापडलेला आहे. पुष्पा-२ सिनेमाच्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यापासून तेलंगाणामधील सरकार आणि पोलिसांनी अल्लू अर्जुनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, अल्लू अर्जुन याच्या हैदबादमधील घरावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटनाही घडली होती.

आता या हल्ल्यातील सहा आरोपींना हैदराबादमधील स्थानिक कोर्टाने जामीन दिला आहे. यादरम्यान, अल्लू अर्जुन याच्या घरावर हल्ला करणा-या आरोपींमधील एक आरोपी रेड्डी श्रीनिवास हा तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा बीआरएसच्या नेत्याने केला आहे. अल्लू अर्जुन याचे हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरात घर आहे. रविवारी संध्याकाळी उस्मानिया विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांना अल्लू अर्जुन याच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ६ आंदोलकांना अटक करण्यात आली होती. आरोपींना हैदराबादच्या स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा कोर्टाने त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा बॉण्ड आणि दोन जामीन हजर करण्यास सांगितले. अल्लू अर्जुन याने मृत महिलेच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

यादरम्यान, बीआरएस नेते कृषांक यांनी आरोप केला की, सहा आरोपींमधील एका आरोपीचे नाव श्रीनिवास रेड्डी आहे. तो मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा निकटवर्तीय आहे. तसेच २०१९ च्या जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघातून त्याने काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. कृषांक यांनी आरोपीचे रेवंत रेड्डींसोबतचे फोटोही एक्सवर शेअर केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR