19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रविशाल अगरवालला जामीन; दुस-या गुन्ह्यात पुन्हा अटक

विशाल अगरवालला जामीन; दुस-या गुन्ह्यात पुन्हा अटक

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अटकेत असलेला बिल्डर विशाल अगरवालला सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. यानंतर लगेचच पोलिसांनी पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात अगरवालला अटक केली आहे.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बिल्डर बाळाने भयानक स्पीडने पोर्शे कार चालविली होती. यामध्ये त्याने चार पाच वाहनांना धडक दिली होती. यात मोटारसायकलवरून जाणा-या तरुण, तरुणीला त्याने उडविले होते. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. बिल्डर बाळाला वाचविण्यासाठी पिता विशाल अगरवालने आमदारालाही पोलिस ठाण्यात पाचारण केले होते.

या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पोलिसांनीही कसोशीने प्रयत्न केले होते. त्याची दारु पिऊन असल्याची चाचणी मुद्दाम उशिराने घेण्यात आली होती. यामुळे बिल्डरचे बाळ दारु पिलेला नव्हता असा अहवाल आला होता. यावरून पोलिसांची नाचक्की होऊ लागताच उपमुख्यमंत्र्यांना पुण्यात धाव घ्यावी लागली होती. यानंतर बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यातही बिल्डरने आपली ओळख आणि पैसा लावून रक्त बदलले होते. बिल्डर बाळाच्या आईचे रक्त देण्यात आले होते.

एवढे सगळे करूनही काँग्रेसचे आमदार रंिवद्र धंगेकर आणि पुणेकरांनी विषय लावून धरल्याने बिल्डरला अटक झाली होती. हा बिल्डर छत्रपती संभाजीनगरला लपून बसला होता. यानंतर विशाल अगरवालच्या वडिलांनाही अटक झाली होती. यानंतरचे अगरवाल कुटुंबियांचे एकेक प्रताप समोर येत गेले तशी बिल्डर बाळासाठी अश्रू गाळणा-या आईलाही अटक झाली होती. अशाप्रकारे सर्व अगरवाल कुटुंबच तुरुंगात गेले होते.

दरम्यान, आज विशाल अगरवालला जामीन मिळाला आहे. यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात नवीन गुन्हा नोंदवर अगरवालला पुन्हा अटक करण्यात आली आहे. लष्कर न्यायालयात हजर केले असता पाच वर्षांपूर्वी घटना घडली परंतु आत्ता फिर्याद दिली आहे, फक्त अगरवाल कुटुंबाला त्रास देण्यासाठी खोटा गुन्हा फिर्यादीने दाखल केला आहे, असा युक्तीवाद करत अगरवालच्या वकिलांनी पोलिसांनी केलेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध केला. यामुळे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता या कोठडीवरून उद्या जामीन अर्ज दाखल केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR