नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना एक दीर्घ पत्र लिहिले आहे. बजरंग पुनिया याने शुक्रवारी पंतप्रधानांना ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. या पत्रात त्याने त्याने बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित वादाचे वर्णन केले आहे.
त्याने पत्रात लिहिले आहे की, “आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जायचो तेंव्हा स्टेज डायरेक्टर आम्हांला पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान म्हणवून ओळख करून द्यायचे आणि लोक मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवायचे. आता असे कोणी केले तर मला तिरस्कार वाटेल. आमही सन्मानाने जगत होतो, पण आता महिला कुस्तीपटूंना चांगले जीवन नाकारण्यात आले आहे.