17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्याबंगळुरूमध्ये कार धुणे, झाडांना पाणी घालण्यावर बंदी!

बंगळुरूमध्ये कार धुणे, झाडांना पाणी घालण्यावर बंदी!

बंगळुरू : भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरू शहर सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. यामुळे शहरात कार धुणे, बागेतील झाडांना पाणी देण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मोठा दंड देखील लावण्यात येणार आहे. या पाणी टंचाईमुळे बेंगळुरू शहराची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत हा पाणी प्रश्न मोठा मुद्दा बनू शकतो.

जवळपास दीड कोटी लोकसंख्या असलेल्या कर्नाटकच्या राजधानीच्या शहरासाठी कावेरी नदीमधून १४५ कोटी लीटर पाणी ९५ किलोमीटर अंतरावरून आणले जाते. समुद्र सपाटीपासून ३००० फूट उंचीवर असलेल्या या शहराला आवश्यक ६० कोटी लीटर पाणी बोरवेलच्या माध्यमातून उपलब्ध होते.

बंगळुरूमध्ये इतकी भीषण पाणी टंचाई असण्याचे कारण शहरातील खाली जाणारी भूजल पातळी आहे. नैऋत्य मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सून पाऊस कमी झाल्याने शहरातील भूजल पातळी खूपच खाली गेली आहे.

बंगळुरू पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका ११० गावांना बसत आहे. या गावांचा नुकतेच बंगळुरू शहरात समावेश करण्यात आला आहे. तसेच दक्षिण बंगळुरूच्या कॉलन्यांमध्ये आणि बहुमजली इमारतींमध्ये राहणा-या लोकांना एक वेगळी जीवनशैली स्वीकारण्यासाठी भाग पाडले जात आहे.

भारतातील सर्वात थंड शहरांपैकी एक असलेल्या बंगळुरू शहरात हवामान विभागाने तापमान वाढ आणि उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना जास्तच बसणार आहेत.
रोज हजार लोकांचा लोंढा
कावेरी फेज-४ प्रकल्पांतर्गत महादेवपुराला ३.५ कोटी लिटर पाणी मिळते, पण एका अंदाजानुसार २०१३ पासून आतापर्यंत महादेवपुरा येथे दररोज १००० नवीन लोक राहायला येत आहेत. या नवीन येणा-या लोकांसाठी बहुमजली इमारती बांधल्या जातात, पण पाण्याचा पुरवठा त्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी टँकर्सनी पाणी मागवले जात आहे. तसेच पावसाच्या कमतरतेमुळे बंगळुरू शहरातील भूजल स्तर खूप खाली गेला आहे. तसेच शहरातील बहुतेक तलाव देखील कोरडे पडले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR