22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसोलापूरवादळी वाऱ्याने केळीच्या बागा भुईसपाट शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

वादळी वाऱ्याने केळीच्या बागा भुईसपाट शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

माढा : परिते (ता. माढा) येथे गेल्या दोन दिवसांत झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे या परिसरातील २० ते २५ एकर केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसगनि नेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अबू आले.

लाखो रुपये खर्च करून आजपर्यंत पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या बागा आज भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण स्वप्नच भंगले आहे. हे आपले दुःख कोणापुढे मांडावे हेच त्यांना समजेनासे झाले आहे.सुधाकर लामकाने या शेतकऱ्याने सांगितले की, माझी दोन एकर केळीची बाग होती. ती संपूर्णपणे भुईसपाट झाली आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR