29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयबॅनर्जी यांनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची मिमिक्री

बॅनर्जी यांनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची मिमिक्री

कोलकाता : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्यामुळे वादात सापडलेले राज्यसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा त्यांची मिमिक्री केली. पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बॅनर्जी म्हणाले की, मिमिक्री ही एक प्रकारची कला आहे. मी मिमिक्री करत राहीन. आवश्यक असल्यास मी ते हजार वेळा करीन. मला माझे मत मांडण्याचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. तुम्ही मला तुरुंगात टाकू शकता. पण मी मागे हटणार नाही. हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या १४६ खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी यांचाही समावेश आहे.

कोणालाही दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही. तथापि, मला एक प्रश्न आहे. ते (जगदीप धनखड) खरच राज्यसभेत असे वागतात का? मिमिक्री ही एक कला आहे आणि २०१४ ते २०१९ दरम्यान पंतप्रधानांनीही लोकसभेत ती केली होती, असा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला. तसेच बॅनर्जींच्या मिमिक्रीवर टीका करताना भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष म्हणाले की, प्रत्येक टीएमसी नेता असे नाटक करतो. या नेत्यांकडे कोणतेही काम नाही, राज्यात विकास नाही, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. घोष म्हणाले की, त्यांना कोणी फोनही करत नाही, त्यामुळे ते मीडियात येण्यासाठी काहीतरी नाटक करत राहतात, नाहीतर भ्रष्टाचार करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR