22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेविरुध्द बांगलादेशचा पराभव

दक्षिण आफ्रिकेविरुध्द बांगलादेशचा पराभव

न्यूयॉर्क : विश्वचषक २०२४ मध्ये खराब अम्पायरिंगवरून वाद सुरू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेशच्या पराभवानंतर पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काल झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या डावाच्या १७ व्या षटकात ओटनीएल बार्टमनचा चेंडू महमुदुल्लाहच्या पायाला लागला आणि चौकार गेला. यावर दक्षिण आफ्रिकेने एलबीडब्ल्यूचे अपील केले आणि अम्पायरने त्याला बाद घोषित केले.

बांगलादेशने या निर्णयाला आव्हान देण्यासाठी डीआरएसचा वापर केला आणि तिस-या पंचाने महमुदुल्लाहला नाबाद घोषित केले. अम्पायरने आऊट दिल्याने हा बॉल डेड बॉल घोषित करण्यात आला, त्यामुळे बांगलादेशला त्या चार धावा मिळाल्या नाहीत आणि शेवटी बांगलादेशचा पराभवही चार धावांच्या फरकाने झाला. पंचांच्या या निर्णयामुळे आणि पराभवामुळे संतप्त झालेल्या बांगलादेशचा फलंदाज तौहीद हार्डायने पंचांच्या निर्णयावर टीका केली.

तौहीद हृदय म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे तर एवढ्या रोमांचक सामन्यात आमच्यासाठी हा निर्णय चांगला नव्हता. माझ्या मते, पंचांनी महमुदुल्लाला बाद घोषित केले, पण आमच्यासाठी हा निर्णय खूप कठीण होता. त्या चार धावांमुळे सामन्याचा निकाल बदलू शकला असता. यासोबतच या सामन्यात अम्पायरिंग अधिक चांगली होऊ शकली असती, अशा शब्दांत तौहीद यांनी अम्पायरिंगवर नाराजी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR