25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाबांगलादेशाला १९७ धावांचे लक्ष्य

बांगलादेशाला १९७ धावांचे लक्ष्य

अँटिग्वा : भारतीय संघाने सुपर ८ मध्ये दुस-या सामन्यात बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य ठेवले. रोहित शर्मा व विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यापासून वंचित राहिले. रिषभ पंतने फॉर्म कायम राखला, परंतु चुकीच्या फटक्याने पुन्हा त्याचा घात केला. सूर्यकुमार यादव अपयशी ठरला असला तरी शिवम दुबेला गवसलेला सूर दिलासा देणारा ठरला. हार्दिक पांड्याने सातत्य राखताना शेवटपर्यंत दमदार खेळ केला.

बांगलादेशने नाणेफेक ंिजकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. बांगलादेशने फिरकीपटूंनी मारा सुरू केला आणि रोहित शर्माने ( २३) त्यांचा चांगला समाचार घेतला. पण, शाकिब अल हसनने टाकलेल्या चौथ्या षटकात रोहित झेलबाद झाला. विराट कोहली चांगल्या टचमध्ये दिसला आणि त्याचे फटके पाहून चाहते आनंदीत झाले. नवव्या षटकात तंझिम हसन साकिबच्या गोलंदाजीवर विराट फटका मारण्यासाठी स्टेपआऊट झाला, परंतु चेंडूने त्रिफळा उडवला. विराटने २८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह ३७ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने पहिलाच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार खेचला, परंतु पुढच्याच चेंडूवर यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन परतला.

साकिबने ३ चेंडूंत भारताला दोन मोठे धक्के दिले. रिषभ पंतने सातत्यपूर्ण कामगिरी सुरूच ठेवताना उत्तुंग फटके खेचले. रिहाद होसेनच्या षटकात चांगली फलंदाजी सुरू असताना रिषभ रिव्हर्स स्वीप मारण्यासाठी गेला आणि झेलबाद झाला. रिषभने २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३६ धावा केल्या. रिषभचा हा फटका पाहून डग आऊटमध्ये बसलेला विराट चिडलेला दिसला. हार्दिक पांड्या व शिवम दुबे यांनी ३४ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली अन् रिशाह होसैनने शिवमची ( ३४ धावा, २४ चेंडू, ३ षटकार) विकेट मिळवली. हार्दिकने २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या आणि भारताला ५ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR