22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकमला हॅरिस यांना बराक-मिशेल ओबामा यांचा पाठिंबा

कमला हॅरिस यांना बराक-मिशेल ओबामा यांचा पाठिंबा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी आज कमला हॅरिस यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी हॅरिस यांना फोन करून पाठिंबा दिला. यासोबतच तुम्हाला पाठिंबा देण्यात आम्हाला अभिमान आहे, तुम्हाला ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि तुम्हाला ओव्हल ऑफिसमध्ये आणण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू असे आश्वासनही ओबामा यांनी हॅरिस यांना दिले. तर दुसरीकडे ट्रम्प देखील जोरदार प्रचार करत आहेत. यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.

निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या हॅरिस यांच्या प्रचार टीमनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून, ओबामा यांनी फोनवर बोलताना हॅरिस यांना पाठिंबा आणि त्यांच्या दीर्घ मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावर हॅरिस यांनी त्यांचे आभार मानले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमधून बाहेर पडलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्येच हॅरिसची वाढती लोकप्रियता निवडणूक रोमांचक बनवत आहे. त्यामुळे त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्धचे आव्हान मजबूत होईल.

दरम्यान, ओबामा हे युनायटेड स्टेट्सचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते आणि ते डेमोक्रॅटिक पक्षातील सर्वांत लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR