24.1 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeराष्ट्रीयथोडा संयम ठेवा, एक्झिट पोलच्या विरूध्द निकाल लागेल

थोडा संयम ठेवा, एक्झिट पोलच्या विरूध्द निकाल लागेल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अवघे काही तास उरले आहेत. अशातच काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधीं यांनी पहिल्सांदाच प्रसारमाध्यमांवर जाहीर करण्यात येत असलेल्या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली आहे.

सोनिया यांनी ‘थोडा संयम ठेवा आणि निकालाची वाट पहा’ लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या विरूध्द असतील असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे. दरम्यान यापुर्वी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधीं यांनी देखील एक्झिट पोलवर निशाना साधत हे एक्झिट पोल नाही तर ‘मोदी पोल ’ आहेत असे म्हटले होते.

दरम्यान देशभरातील माध्यमांव्दारे चालवण्यात येणा-या पोलमध्ये तिस-यांदा भाजपचीच सत्ता येईल असा दावा करण्यात येत आहे. मात्र, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एक्झिट पोलवर अविश्वास दाखवला आहे.

अशातच सोनिया गांधीनींही एक्झिट पोल विरूध्द निकाल लागतील असा दावा केला आहे. यामुळे उद्याचा सुर्य इंडिया आघाडी-एनडीएला प्रकाशमय करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काँग्रेसने इंडिया आघाडीने २९५ पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR