19.7 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा

मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा

रेल्वे भरतीची जाहिरात शेअर करत राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन

मुंबई : भारतीय रेल्वे विभाग ‘सहाय्यक लोको पायलट’च्या विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण ५६९६ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वे लोको पायलट भारती २०२४ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून वृत्तपत्राद्वारे जाहिराती देखील देण्यात आल्या आहे.

दरम्यान मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत या भरतीसाठी तरुणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील मनसैनिकांना केले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या भरतीच्या जाहीरातीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत मनसैनिकांना आवाहन केले आहे. जास्तीत जास्त मराठी तरूण तरूणींना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मनसेच्या शाखांवर, कार्यालयांमध्ये या संबधीचे तपशील लावा असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘ रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग यासाठी तत्पर आहेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतेच ‘‘बघा वेबसाईट’ असे म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर याचा रितसर तपशील लावावा.

याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची याचेही पूर्ण मार्गदर्शन करावे. जास्तीत-जास्त मराठी तरूण यात नोकरी कशी मिळवेल याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष दिले गेले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR