22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeपरभणीमतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!

परभणी : जिल्हा निवडणूक विभाग अंतर्गत स्वीप पथकाच्या वतीने जिल्हा, तालुका, शहर भाग, ग्रामीण भाग, आठवडी बाजार, बसस्थानक अशा अनेक ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. दि. २८ ऑक्टोबर रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय जवळ असलेल्या मैदानातील फटाके सेंटरच्या ठिकाणी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो! म्हणत जिल्हा स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती करण्यात आली.

फटाके विकत घेण्यासाठी येत असलेल्या लोकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी होय, मी मतदान करणारच! असे स्लोगन असलेले स्टिकर्स वाटप करुण येणा-या दि. २० नोव्हेबर रोजी कुटुंबातील मतदार व्यक्तिनी १०० टक्के मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले. प्रत्येक मतदारांनी स्वत: तर मतदान करावेच कुटुंबातील इतर मतदार सदस्यासह शेजारी असणा-या मतदार व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित करावे असे स्वीप पथकाच्या वतीने गीत, संगीत, लघुनाटिकातून सांगितले.

यावेळी स्वीप जिल्हा नोडल अधिकारी गणेश शिंदे, स्वीप सदस्य अरविंद शहाणे, प्रवीण वायकोस, हनुमंत हंबिर, त्र्यंबक वडसकर, प्रा. भगवान काळे, रामप्रसाद अवचार, महेश देशमुख, प्रफुल्ल शहाणे, मोहन आल्हाट, बबन आव्हाड, शिवाजी कांबळे, लक्ष्मण गारकर, सुधाकर गायकवाड, प्रा. प्रवीण लोनारकर, वैभव पुजारी, ज्ञानेश्वर पाथरकर, संजय पेड़गावकर, प्रशांत मेने, महेश शेवाळकर, प्रसन्न भावसार, विशाल पाटील, का. रा. चव्हाण, नबी, शिवाजी वाघमारे, सुनील वाघ आदिनी मतदान जनजागृती केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR