26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रकराळे मास्तरांना मारहाण

कराळे मास्तरांना मारहाण

वर्धा : प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली. कराळे मास्तरांच्या मांडवा या गावात त्यांना मारहाण करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला.

या प्रकरणाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झाल्यानंतर कराळे मास्तरांनी वर्ध्यातील सावंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

वर्ध्यातील मांडवा या गावातून मतदान करून परत येत असताना कराळे मास्तरांना ही मारहाण झाली. उमरी मेघे येथील उपसरपंच सचिन कोसे यांनी कराळे मास्तरांना मारहाण केली. यावेळी मारहाण करणा-यांनी कराळे मास्तरांना शिवीगाळ केल्याचेही दिसून येत आहे. तुम्हाला मारहाण करण्याचा कोणताही अधिकार नाही असे कराळे मास्तर त्यांना म्हणताना दिसत आहेत. पण तरीही समोरून शिवीगाळ होताना व्हीडीओमध्ये दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR