22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयक्षणात झाला अब्जाधिश; ९९०० कोटी जमा

क्षणात झाला अब्जाधिश; ९९०० कोटी जमा

भदोही : उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. सुरियावान पोलीस स्टेशन हद्दीतील अर्जुनपूर गावात राहणा-या तरुणाच्या खात्यात ९९ अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आली. ही माहिती मिळताच खातेदारच नव्हे तर बँकेच्या मॅनेजरलाही मोठा धक्का बसला आहे. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, भानू प्रकाश याच्या केसीसी खात्यातील थकबाकीमुळे हे घडले आहे आणि सध्या खाते होल्डवर ठेवण्यात आले आहे.

दुर्गागंजच्या अर्जुनपूर गावात राहणारा भानुप्रकाश ंिबद याच सुरियावानच्या बँक ऑफ बडोदा ग्रामीण बँकेत खाते आहे. गुरुवारी, १६ मे रोजी अचानक त्यांच्या खात्यात ९९९९४९५९९९.९९ (९९ अब्ज ९९ कोटी ९४ लाख ९५ हजार ९९९ रुपये) रक्कम येऊ लागली. एवढी मोठी रक्कम अचानक या व्यक्तीच्या खात्यात आल्याने बँक कर्मचारी चक्रावले. बँक कर्मचा-यांनी तत्काळ याची माहिती खातेदार भानुप्रकाश ंिबद याला दिली. माहिती मिळताच त्यांनी बँकेत धाव घेतली, तेथे खातेदार भानुप्रकाश याला त्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम पाहून धक्काच बसला. बँक मॅनेजर आशिष तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खातेदार भानुप्रकाश याचे केसीसी खाते असून त्या खात्याद्वारे त्याने शेतीवर कर्ज घेतले होते.

खाते एनपीए झाल्यानंतर, अशी चुकीची रक्कम दिसून आली आणि खाते होल्डवर ठेवले गेले. ते म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड लोन अकाऊंटच्या नॉन-परफॉर्मिंग एसेट बनल्यानंतर, सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे मायनस चिन्ह दिसत नसल्यामुळे एवढी मोठी रक्कम खात्यात दिसत होती. ही चूक लक्षात येताच बँकेने तात्काळ कारवाई करत परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR