लखनौ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अवैध संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली. त्याने पत्नीचा गळा कापला. त्यानंतर तिचे शिर आणि धारदार हत्यार घेऊन तो रस्त्यावरून चालू लागला. हा प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली.
पोलिसांनी आरोपीकडून महिलेचं शिर ताब्यात घेतलं. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती एएसपी सी. एन. सिन्हा यांनी दिली. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. त्यामुळे या भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या तरी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
घटना फतेहपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणा-या बसारा गावात घडली. अनिल नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली. पत्नीचं शिर हातात घेऊन तो पोलिस ठाण्याकडे निघाला. पण पोलिसांनी त्याला रस्त्यातच पकडले. मी पत्नीची हत्या केली आहे. मला अटक करा, असे आरोपी अनिल पोलिसांना सांगत होता.
पत्नीचे विवाहबा संबंध असल्याचा संशय अनिलला होता. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. याच विषयावरून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यानंतर अनिलने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केली. खून केल्यानंतर पत्नीचं कापलेलं शिर घेऊन अनिल पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याला रस्त्यातच अटक केली. या घटनेमुळे परिसरात तणाव आहे.