नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संगीतकार प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण काळाच्या पडद्याआड गेले. प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचे ९ नोव्हेंबर रोजी निधन झाले. राम नारायण यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राम नारायण यांनी भारतीय संगीताला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवणारे ते पहिले भारतीय संगीतकार होते.
राम नारायण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रासह बॉलिवूड इंडस्ट्रीवरही शोककळा पसरली. राम नारायण सारंगीला भारतीय शास्त्रीय संगीतातील एकल वाद्य म्हणून लोकप्रिय केले आणि ते पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी सारंगी वादक बनले. त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथुजी बियावतही शेतकरी आणि गायक होते. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२७ रोजी उत्तर-पश्चिम भारतातील उदयपूरजवळील आमेर गावात झाला.
त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथुजी बियावत शेतकरी आणि गायक होते. नथुजी बियावत दिलरुबा वादक होते आणि नारायण यांची आई संगीतप्रेमी होती. त्यांचे आजोबा बगाजी बियावत हे आमेरचे गायक होते.