22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeराष्ट्रीयहाथरसमध्ये बेपवाईने घेतला १२१ निष्पाप भाविकांचा बळी

हाथरसमध्ये बेपवाईने घेतला १२१ निष्पाप भाविकांचा बळी

हाथरस : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. सत्संग घेणारा भोले बाबा फरार झाला होता, मात्र त्याचा ठावठिकाणा सापडला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सेवेकरी देव प्रकाश आणि अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र आयोजकांकडून केवळ ८० हजार लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले होते.

तपासात आढळलेल्या त्रुटी….
एक्झिट आणि एंट्री पॉइंट पूर्वी बनवलेले नव्हते. मार्किंग करून पाइंट्स तयार केले होते, पण मार्किंग कुठेच दिसत नव्हते. आपत्कालीन मार्ग बनवला गेला नाही. ८० हजार लोकांसाठी वैद्यकीय पथक नव्हते. किमान 5 रुग्णवाहिका असायला हव्या होत्या, त्यावेळी तिथे त्या नव्हत्या. गर्दीनुसार कुलर आणि पंख्यांची व्यवस्था नव्हती. गर्दीनुसार कमी स्वयंसेवक होते. प्रशासनाने तैनात केलेला फौजफाटा नगण्य होता. खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था नव्हती. ज्या रस्त्यावरून बाबांचा ताफा गेला त्या रस्त्यावर कोणतेही बॅरिकेडिंग नव्हते. आयोजकांनी घेतलेल्या परवानगीमध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख नव्हता. संपूर्ण शेताचे सपाटीकरण करून किमान १० एकर जमीन सपाट करणे आवश्यक होते, ते केलेले नव्हते.
शेताच्या सभोवताली प्रवेशाचे रस्ते बांधले जाणार होते, पण ते बांधले गेले नाहीत. फक्त एक छोटासा कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. परवानगी घेणे आणि देणे या दोन्ही बाबतीत मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा होता.

बाबा आपल्या सुरक्षेसाठी पुरुष आणि महिला रक्षक ठेवतो. त्याने आपल्या सुरक्षा कर्मचा-यांच्या टीमचे नाव नारायणी सेना ठेवले आहे. ही सेना बाबाची आश्रमापासून ते प्रचारस्थळापर्यंत सेवा करते. भोले बाबा आपल्या सेवकांनाच आपल्या संरक्षणात ठेवतो. सर्व्हिसमन फक्त एक प्रकारचा ड्रेस कोड घालतात. भोले बाबांच्या सत्संगात संपूर्ण व्यवस्था सेवकांच्या हातात असते.

भोले बाबाच्या शोधात पोलिसांची छापेमारी
भोले बाबाच्या शोधात अनेक ठिकाणी पोलिसांचे छापेमारी सुरू आहे. बदाऊन, फारुखाबाद, हाथरस, अलीगढ, कासगंज, एटासह सुमारे ८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. भोले बाबाच्या सत्संगाची संपूर्ण व्यवस्था नारायणी सेनेच्या हातात असते. या बाबाचे अनेक शिष्य पोलिसातही आहेत. सत्संगाच्या वेळी ते रजा घेऊन येतात आणि बाबांच्या ताफ्याला घेऊन जातात.

एफआयआर दाखल, बाबाचे नाव नाही
चेंगराचेंगरी प्रकरणी ३ जुलै रोजी पहिला एफआयआर दाखल करण्यात आला. पण, यामध्ये भोले बाबा उर्फ बाबा नारायण हरी उर्फ साकार विश्वा हर भोले बाबा यांचे नावच नाही. एफआयआरमधील माहितीनुसार, सत्संग आयोजित करणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर आणि इतर जणांविरोघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR