मुंबई : साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले आहे. अभिनेता आणि राजकारणी बनलेला पॉवर स्टार चित्रपटांसोबतच राजकारणातही सक्रिय आहे. पवन कल्याण आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. पवन कल्याणच्या चित्रपटांची दक्षिण भारतातच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांमध्येही त्याच्या डब चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे.वाढदिवसानिमित्त पवन कल्याणवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन कल्याण हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे आणि २०१२ पासून अनेक वेळा फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० यादीत त्याचे नाव आले आहे. यासोबतच पवन कल्याणला अनेक प्रसिद्ध पुरस्कारांव्यतिरिक्त फिल्मफेअर पुरस्कार आणि सिमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, पवन कल्याणचे बहुतेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत, परंतु त्यापैकी काहींनी हिंदीत डब देखील केली आहेत.
पवन कल्याणचे मोठे भाऊ चिरंजीवी आणि नागेंद्र बाबू हे देखील चित्रपटसृष्टीत खूप लोकप्रिय आहेत. पवन कल्याणने १९९६ मध्ये ‘अक्कडा अम्मी इक्कडा अब्बाय’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाचा हिंदी डबही प्रेक्षकांना खूप आवडला होता. याशिवाय असे अनेक चित्रपट आहेत जे हिंदी प्रेक्षकांना खूप आवडले. या यादीत पवन कल्याण आणि समंथाच्या ‘अत्तरिन्तिकी’ ‘दरेडी’ ’जलसा, ‘थोली प्रेमा, ‘कुशी’ आणि ‘गब्बर सिंह’ या चित्रपटांचाही समावेश आहे. पवन कल्याणने तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच तो निमार्ता, दिग्दर्शक, गायक आणि राजकारणी देखील आहे.