मुंबई : प्रतिनिधी
‘सिंघम अगेन’मध्ये अनेक मोठे कलाकार एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत रोहित शेट्टीने अनेक बड्या कलाकारांची ‘फौज’ या चित्रपटात ठेवली आहे. त्यात सलमान खानचाही कॅमिओ असू शकतो, असे बोलले जात होते. तो चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे.
त्यानंतर बाबा सिद्दीकीची हत्या आणि लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सल्लूचा कॅमिओ रद्द झाल्याची चर्चा होती, पण आता या चित्रपटात त्याचा कॅमिओ असणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी २२ ऑक्टोबर हा शूटिंगचा दिवस निश्चित करण्यात आला होता.
अलीकडेच ‘सिंघम अगेन’मध्ये सलमान यापुढे कॅमिओ करणार नसल्याची बातमी बॉलिवूड हंगामाने प्रसिद्ध केली होती. यामागे त्याच्या सुरक्षिततेचे कारण देण्यात आले. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानने त्याचे सर्व शूटिंग शेड्यूल रद्द केल्याचे बोलले जात होते. दरम्यान, अशीही बातमी आली होती की तो ‘बिग बॉस १८’ साठी शूट करणार नाही, पण सलमान खान त्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. त्याने ‘वीकेंड का वार’चे शूटिंग केले. हा एपिसोड टेलिकास्टही झाला आहे.